Talegaon Dabhade Crime News : तळेगावातील बड्या व्यावसायिकाची 26 लाखांची फसवणूक

Talegaon Dabhade Crime News : तळेगावातील बड्या व्यावसायिकाची 26 लाखांची फसवणूक
Pckhabar- एका शोरूमच्या मॅनेजरने
एकाच दुचाकीचे दोन ते तीन वेळा बिलिंग करून आर.टी.ओ. रजिस्ट्रेशनच्या पावत्यांमध्ये खाडाखोड केली. खोटे व चुकीचे नंबर टाकुन दुचाकींची परस्पर विक्री करून 26 लाख 59 हजार 235 रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार
31 मार्च 2017 ते 16 ऑगस्ट 2021 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील खांडगे ॲटोमोबाईल येथे घडला.

सिध्दार्थ सतिष दळवी (वय-३०, रा मॉन्टेना बिल्डींग फ्लॅट नं ए १०५ रेनो सोसा विद्याविहार कॉलनी, चाकण रोड तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शोरूम मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी उद्योजक गणेश वसंतराव खांडगे (वय-५०, रा. फ्लोरा सिटी, खांडगे नगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ दळवी हा
खांडगे ॲटोमोबाईलचा मॅनेजर म्हणून कार्यरत होता. आरोपीने एकाच दुचाकीचे दोन ते तीन वेळा बिलिंग करून आर.टी.ओ. रजिस्ट्रेशनच्या पावत्यांमध्ये खाडाखोड केली. खोटे व चुकीचे नंबर टाकुन ते नंबर खरे असल्याचे ग्राहकांना भासवुन दुचाकी वाहनांची परस्पर विक्री केली. त्याबदल्यात ग्राहकांकडून व सब डीलरकडून आलेले 26 लाख 59 हजार 235 रूपयांची फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक साळी अधिक तपास करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *