IPL 2021 News: कोलकत्याचा मुंबई इंडियन्स दणदणीत विजय
Pckhabar- कोलकात्याने मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबईने कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान कोलकात्याने ३ गडी गमवून १६ व्या षटकात पूर्ण केले.
वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. दोघांनी मुंबई च्या गोलंदाजीची तुफान धुलाई केली. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. ५३ धावांवर असताना बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अय्यरनंतर राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावलं. त्रिपाठीने ४२ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमरानं ३ गडी बाद केले. या पराभवानंतर मुंबई संघाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर कोलकात्याचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला. मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग या पराभवामुळे खडतर झाला आहे.
तत्पूर्वी रोहित शर्मा आणि डिकॉकने मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहित शर्माने ३० चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. तर डिकॉकने अर्धशतकी खेळी केली. डिकॉकने ४२ चेंडूत ५५ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज साजेशी कामगिरी करू शकले नाही. मोठे फटके मारताना एका मागोमाग एक बाद झाले. सुर्यकुमार ५ धावा, इशान किशन १४ धावा, पोलार्ड २१ धावा, तर कृणाल पांड्या १२ धावा करून बाद झाला. कोलकात्याकडून प्रसिद्ध क्रिष्णाने २, लॉकी फर्ग्युसनने २, तर सुनील नरेननं एक गडी बाद केला.
गुणतालिकेत दिल्ली पहिल्या स्थानी, चेन्नई दुसऱ्या स्थानी, बंगळुरु तिसऱ्या स्थानी, तर कोलकाता चौथ्या स्थानी आहे.










Leave a Reply