Editorial : गुन्हेगारी वाढतेय, ’आयर्न मॅन’ गुन्हेगारांवर जरब बसवा !
Pckhabar-पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच मी असेपर्यंत गुन्हेगारांनी दुसरा धंद्दा बघावा, अशी वल्गणा करणार्या आणि ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळातही गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे. कृष्णप्रकाश यांनी पदभार स्विकारल्यापासून शहरात 86 खून, 163 बलात्कार, 1363 वाहनचोरी, 323 विनयभंग झाले आहेत. तर शहर परिसरात गेल्या चार दिवसात सहा खूनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे भयमुक्त शहराचा नारा देणार्या ’केपी’च्या राजवटीत गुन्हेगाराचा हैदोस सुरू आहे. त्यामुळेच आयुक्त साहेब गुन्हेगारांवर धाक बसवून खर्या अर्थाने शहर भयमुक्त करा, अशी सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा आहे.
कृष्ण प्रकाश यांनी 5 सप्टेंबर 2020 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारताच कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगाराची हयगय केली जाणार नसल्याचे ठासून सांगितले होते. त्यांनी प्रमाणे शहरातील अवैद्य धंंद्यांवर मोहिम राबवत अवैद्य धंद्यांवाल्यांना सळो की पळो करून सोडले. तसेच ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हद्दीत अवैध धंद्दे आढळल्यास त्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, आजही शहराच्या विविध भागात अवैध धंदे सुरूच आहेत. पोलीसांच्या कारवाईच्या दररोज प्रेसनोट येत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी घटना कमी झाल्या अथवा घट झाली असे म्हणता येणार नाही. शहर परिसरात गेल्या चार दिवसात सहा खूनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील आगामी चार ते पाच महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका, आळंदी नगरपरिषद, तळेगाव दाभाडे आणि देहू नगरपंचायतची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राजकारणातील ’व्हाईट कॉलर’ गुन्हेगारांवरही जरब बसविणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा ऐन निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
याबाबत आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले’’वैयक्तिक, कौटुंबिक कारणातून हे खून होत आहेत. दारूच्या नशेत, रागाच्या भरात असताना अनेकांकडून खूना सारख्या गंभीर घटना घडत आहेत. अशा खूनाच्या घटना घडणेही चुकीचे असले तरी सामाजिक शांततेचा भंग होत नसून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होत नाही. आयुक्तालय हद्दीत गुंडगिरी वाढली नसून कायदा-सुव्यस्था चांगली आहे. गेल्या तीन वर्षांत पेक्षा शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचा दावा आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केला आहे’’.
तसेच शहर परिसरातील निर्जन स्थळाचा सर्व्हे करण्यात आला असून अशा भागात पेट्रोलिंग कशाप्रकारे करणे गरजेचे आहे, याचा विचार करत आहोत. गुन्हे घडणार्या परिसराचा अभ्यासही सुरू असून पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येत आहेत. तर हिंजवडी आणि वाकडमध्ये सीसीटीव्ही गरज असून राज्य सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.
कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळातील
शहरातील गुन्ह्याची आकडेवारी (5 सप्टेंबर 2020 ते ऑगस्ट 2021 पर्यंतचे गुन्हे) -86 खून, 163 बलात्कार, 1367 वाहनचोरी, 323 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या चार वर्षांतील खूनाच्या घटना पुढीलप्रमाणे – 2018-72
2019-68
2020-71
तर 2021- 23 सप्टेंबरअखेर 48
संपादक
Pckhabar.Com










Leave a Reply