
Dehuroad News : अन्यथा रस्त्यात बेशरमचे झाड लावू; मनसेचा कॅंटोन्मेंट प्रशासनाला इशारा
Pckhabar- देहूरोड शहरातील बहुतांश रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यांवरील ड्रेनेजची झाकनेही तुटली आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा रस्त्यात बेशरमचे झाड लावण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास यांनी दिला आहे.
या संदर्भात दास यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे. देहूरोड शहरातील व बाजारपेठही बहुतांश रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकणी रस्त्यांवरील ड्रेनेजची झाकनेही तुटली आहेत. त्यामुळे अपघातही घडू लागले आहेत. अपघात रोखण्यासाठी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी दास यांनी निवेदनात केली आहे.
दरम्यान, कॅंटोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी दास यांच्याकडून निवेदन स्वीकारले.










Leave a Reply