Dehugaon News : जिल्हा परिषद शाळेला प्रेरणादायी पुस्तके भेट

Dehugaon News : जिल्हा परिषद शाळेला प्रेरणादायी पुस्तके भेट

वाचनवेड संस्थेच्या सहकार्याने अभंग प्रतिष्ठानचा उपक्रम

Pckhabar-रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अवघे जीवन समर्पित करणारे,परमपूज्य कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वाचनवेड संस्था पुणे’ यांच्या विशेष सहकार्याने व अभंग प्रतिष्ठान देहू यांच्या माध्यमातून प्रेरणादायी पुस्तके वाटपाचा कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा, सांगुर्डी या शाळेत संपन्न झाला.

याप्रसंगी सांगुर्डी गावचे सरपंच वसंत भसे, योग शिक्षक दत्तात्रय भसे, माजी उपसरपंच सचिन कुंभार, सचिन काळोखे, दिनेश साळुंके, लक्ष्मण काळोखे, विजय मोरे, सचिन लिंभोरे, विकास कंद, ऋषिकेश लिंभोरे उपस्थित होते.

याप्रसंगी योगशिक्षक दत्तात्रय भसे व सरपंच वसंत भसे यांनी मनोगत व्यक्त करताना वाचनवेड संस्थेचे प्रमुख आदरणीय किरिटी मोरे व मयूर यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करून अभंग प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *