Chinchwad News : जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!
Pckhabar- शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी आज ( बुधवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
मुंबई येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे. चिंचवडे यांच्यासह कामगार नेते अमोल कलाटे आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
चिंचवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.











Leave a Reply