Pune District News : ग्रीन फाऊंडेशनच्या लोकोपयोगी कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Pune District News : ग्रीन फाऊंडेशनच्या लोकोपयोगी कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप यांचा कवी विठ्ठल दळवी यांनी केला सत्कार

Pckhabar- लोणी काळभोर येथील ग्रीन फाऊंडेशनने कोरोना काळात गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य स्वरूपात मदत, वृक्षसंवर्धन तसेच इतर लोकोपयोगी कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेऊन त्यांच्या या कार्याचा गौरव केला आहे. याबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांचा कवी विठ्ठल दळवी यांनी त्यांचा सत्कार केला.

ग्रीन फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गेली पाच वर्षापासून निसर्ग संवर्धनाचे कार्य सुरू आहे. यामध्ये वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनावर जास्त भर देण्यात येत आहे. फाऊंडेशनचे माध्यमातून वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, शालेय साहित्य वाटप, अन्नधान्य स्वरूपात मदत, उन्हाळ्यात पक्ष्यांना धान्य पाणी उपक्रम, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, झाडे लावा जगवा झाडे जनजागृती असे बहुतांश उपक्रम राबवण्यात येत आहेत. याबरोबरच करोना काळात गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य स्वरूपात मदत पोहोचवली आहे.

त्यामुळेच संस्थेच्या कार्याची दखल घेऊन लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे युरोप स्वित्झर्लंड प्रमुख बेल्हेल्म जेझलर तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी सदर पुरस्कार जाहीर केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *