Dehugaon News : गणेश मूर्ती संकलनाला उदंड प्रतिसाद

Dehugaon News : गणेश मूर्ती संकलनाला उदंड प्रतिसाद

उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांच्या वतीने गणेश मूर्ती संकलन
Pckhabar- देहूगावचे उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांच्या वतीने अनंत चतुर्दशीला राबविण्यात आलेल्या गणेश मूर्ती संकलनाला विठ्ठलवाडी, देहूगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

गणेश मूर्ती संकलन रथाच्या उद्घाटनासाठी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी, इंद्रायणीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि शासकीय आदेशांचे पालन करण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गणेशभक्तांच्या ‘श्रद्धेला आणि भावनेला तडा जाऊ नये’ म्हणून आम्ही सर्व गणेश मूर्तीचे विधिवत पूजन करूनच विसर्जन केले आहे, असे स्वप्नील आप्पा काळोखे यांनी सांगितले.

काळोखे यांच्या वतीने देहूगाव आणि विठ्ठलवाडी परिसरात गणेश मूर्ती संकलनासाठी दोन टेम्पोची व्यवस्था करण्यात आली होती. टेम्पो बरोबर मूर्ती संकलनासाठी कार्यकर्ते होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *