IPL 2021News : शेवटच्या षटकात पंजाबचा घात; राजस्थान रॉयल्सचा 2 धावांनी विजय

IPL 2021News : शेवटच्या षटकात पंजाबचा घात; राजस्थान रॉयल्सचा 2 धावांनी विजय

Pckhabar-इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील दुसऱ्या टप्प्याला युएई येथे सुरुवात असून या टप्प्यातील तिसरा सामना मंगळवारी पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत थरार रंगला. या सामन्यात अखेरच्या क्षणी राजस्थानने २ धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत पाचवा क्रमांक मिळवला आहे.

राजस्थानने पंजाबसमोर विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली होती. कर्णधार लोकेश राहूल आणि मयांक अग्रवाल यांनी शतकी भागीदारी केली होती. मात्र, अखेरच्या षटकात त्यांना केवळ ४ धावांची गरज होती आणि ८ विकेट्स शिल्लक होत्या. पण शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या कार्तिक त्यागीने केवळ १ धाव दिली आणि २ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे नाट्यपूर्ण ठरलेल्या अखेरच्या षटकात पंजाब ४ धावाही करु न शकल्याने राजस्थानने हा सामना २ धावांनी जिंकला. कार्तिक त्यागीचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *