Hinjawadi crime news : पत्नीबाबत अश्लील बोलल्याने मित्राचा गळा आवळून खून

Hinjawadi crime news : पत्नीबाबत अश्लील बोलल्याने मित्राचा गळा आवळून खून
Pckhabar- पत्नीबाबत अश्लील शब्द वापरल्याने मित्राला दारू पाजून फडक्याने गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना बाणेर येथे
घडली. आसामला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला हिंजवडी पोलीसांनी गजाआड केले.

अच्युत भुयान (वय ३७, रा. सूस रोड, बाणेर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
कमल राजन शर्मा (वय १८, रा. सुस रोड, बाणेर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
भुयान आणि कमल हे मुळचे आसाम येथील असून ते एका सुरक्षा एजन्सीमध्ये
कामाला होते. आरोपी कमल आणि भुयान यांच्यासह पाच जण भाड्याने राहतात. दोन दिवसांपूर्वी भुयान याने कमलच्या पत्नीवर अश्लील कमेंट केल्याने त्यांची भांडणे झाली होती. घटने दिवशी भुयान हा घरी असताना आरोपी कमल हा कामावरून घरी आला. त्याने भुयान याला दारू पाजली. त्यानंतर दारूच्या नशेत भुयान याने  पुन्हा कमलच्या पत्नीबाबत अश्लील कमेंट केली. त्यामुळे आरोपी कमलने
डोक्यावर बांधण्याचे फडक्याने भुयानचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो
पुन्हा कामावर निघून गेला. त्यांच्या घरात स्वयंपाक करणारी महिला सायंकाळी आली असता तिला भुयान गळ्याला फास अडकवलेल्या स्थितीमध्ये दिसून
आला. तिने ताबडतोब घरमालक नलावडे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी
त्वरीत पोलीसांना कळविले. हिंजवडी पोलीसांनी तातडीने तपास करत आरोपी कमल याला मूळ गावी आसाम येथे पळून जाण्याचे तयारीत असताना जेरबंद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *