Bhosari Crime News : दोन हजारांच्या 40 बनावट नोटा जवळ बाळगणार्या एकाला अटक
Pckhabar- दोन हजार रूपयांच्या 40 बनावट नोटा जवळ बाळगणार्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट नोटा, 6 हजारांची रोकड, एक कार असा 6 लाख 6 हजार 570 रूपये जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडली.
संदीप पंढरीनाथ पांचाळ (वय-36, रा. वडगाव, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई एस. ए. जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा दोन हजार रूपयांच्या 40 बनावट नोटा स्वतः जवळ अवैधरित्या बाळगूण होता. त्या खर्या असल्याचे भासवून चलनात वापर करण्याचा त्याचा डाव होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला होंडा अमेज कार (एमएच-22, पी. 3003) आणि रोकड असा 6 लाख 6 हजार 570 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply