Talegaon Dabhade Crime News : दिराच्या मित्राचा महिलेवर बलात्कार; दिराला नकार दिल्याने गळा दाबून केला खून

Talegaon Dabhade Crime News : दिराच्या मित्राचा महिलेवर बलात्कार; दिराला नकार दिल्याने गळा दाबून केला खून

Pckhabar- महिलेवर दिराच्या मित्राने जबरदस्तीने बलात्कार करून दिरानेही शरीर सुखाची मागणी केली. मात्र, वहिनीने त्याला नकार दिल्याने चिडलेल्या दिराने ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून खून केला. तसेच तोंडावर दगडाने मारून मृतदेह झाडीत टाकला. ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मिताली सोमनाथ दडस (वय-19, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती सोमनाथ साहेबराव दडस (वय-21) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अक्षय कारंडे आणि तुकाराम कोडींबा दडस (वय-26, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी  मिताली यांना घोराडेश्वर डोंगर घेऊन गेले. झाडीत तिच्यावर आरोपी अक्षयने जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तुकारामने मितालीकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्यामुळे चिडलेल्या तुकारामने ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून खून केला. तसेच तोंडावर दगडाने मारून मृतदेह झाडीत टाकला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *