Chikhali News : चिखलीतील रस्त्याचे नामकरण
Pckhabar- चिखलीतील नव्याने विकसित झालेल्या रस्त्याचे पिंगळे रोड असे नामकरण करण्याते आले आहे. या नाम फलकाचे उद्घाटन स्थानिक नगरसेविका साधना मळेकर, नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव नेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक एस. बी. पाटील, प्रशांत कहाने, युवा नेते जितेंद्र यादव, विकास साने, समीर पिंगळे यांच्यासह पिंगळे कुटुंबातील सर्व सदस्य, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेविका साधना मळेकर म्हणाल्या, ’’रस्त्याचे नामकरण होण्यापुर्वी नागरिकांना, स्थानिक व्यापार्यांना अनेक अडचणी येत होत्या. महत्वाची कागदपत्रे योग्य पत्या अभावी वेळेवर मिळत नव्हती. त्यामुळे या रस्त्याला पिंगळे नाव दिल्याने नागरिकांची आता गैरसोय दुर होणार आहे’’.
नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले’’चिखली परिसरात महापालिकेच्या वतीने प्रशस्त असा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे चिखलीतील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.’’
समीर पिंगळे यांनी पिंगळे परिवाराच्या वतीने आभार मानले.











Leave a Reply