IPL 2021 : चेन्नईच सुपर, मुंबईवर 20 धावांनी विजय
Pckhabar-कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व कालपासून पुन्हा सुरु झाले आहे. पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघादरम्यान खेळविण्यात आली.
चेन्नईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय़ घेतला. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजने एकाकी झुंज देत 156 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आता मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या बाॅलरने चांगली कामगिरी बजावली.
मुंबईच्या सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असले तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली. ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.










Leave a Reply