Moshi Crime News : गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे इंद्रायणी नदीत बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

Moshi Crime News : गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे इंद्रायणी नदीत बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

Pckhabar- गणेश विसर्जनासाठी इंद्रायणी नदीत उतरलेल्या चौघांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने दोघांचा  नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार)  हवालदार वस्ती आळंदी  इंद्रायणी नदीमध्ये घडली. यामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे ठोंबरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय.२०) प्रज्वल रघुनाथ काळे (वय.१८, रा. माऊली वस्ती ,डुडळगाव) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. प्रज्वलित मृतदेह आढळून आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय.३०),  नितीन अर्जुन ठोंंबरे (वय.३९), दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय.२०) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय.१८, सर्व रा. माऊली वस्ती ,डुडळगाव) हे चौघे गणपती विसर्जनासाठी नदीत उतरले होते.
पाण्यात मध्यभागी  गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दता ठोंबरे व  प्रज्वल काळे यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाले. तर शिवाजी आणि नितीन सुखरूप पणे बाहेर आले.

घटनेची माहिती मिळताच MIDC भोसरी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांच्या पथकाने धाव घेतली.  पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला असता प्रज्वल काळे यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला असून दत्ता ठोबरे यांचा शोध चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *