Pimpri News : नोकरी व कौशल्य  विकास मेळाव्यातून मिळालेल्या संधीचे सोने करा : लायन ओमप्रकाश पेठे

Pimpri News : नोकरी व कौशल्य  विकास मेळाव्यातून मिळालेल्या संधीचे सोने करा : लायन ओमप्रकाश पेठे
Pckhabar-लायन्स क्लब्स इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,स्टाफ ब्लूम, युनिक स्किल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने “नोकरी व कौशल्य विकास मेळावा” गुरुवारी  लायन्स स्किल सेंटर पिंपरी येथे उत्साहात पार पडला.

या प्रसंगी माजी प्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कठोर परिश्रम, परस्परांवरील विश्वास,कौशल्य विकासाचा ध्यास यांच्या बळावर मिळालेल्या संधीचे सोने करा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. युनिक स्किल डेव्हलपमेंटचे संचालक बाळासाहेब झरेकर  व विजय कुलकर्णी यांनी कॉम्पुटर व फॅशन डिझाईनचे कोर्सेस,त्यासाठीची पात्रता, नोकरी व व्यवसायाच्या संधी या विषयी सविस्तर माहिती सांगितली. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन  केले.

स्टाफ ब्लूमचे संजय सिंग व जयंत तांबडे यांनी बँकिंग क्षेत्रातील ४५ दिवसांचा कोर्स व त्याच्या यशस्वी पूर्ततेंनंतर मिळणाऱ्या संधी या संबंधी मार्गदर्शन केले.

शेखर चिंचवडे युथ फॉउंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे व  सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी लायन्स स्किल सेंटरला सदिच्छा भेट दिली. लायन अशोक येवले यांनी त्यांचे स्वागत केले व लायन्सचे कार्य, नोकरी मेळाव्यास मिळत असलेला प्रतिसाद, पिंपरी सेंटरवर कौशल्य विकासासाठी सुरू केलेले कोर्सेस याची सविस्तर माहिती सांगितली. लायन्सच्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले व लायन्सच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवीची प्रतिमा आयोजकांना भेट दिली. चिंचवड प्रभागातील होतकरूंना समुपदेशन करून गुरुवार दिनांक ३0 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पाचव्या मेळाव्यास पाठवू व उपस्थितांना मार्गदर्शन करू असे प्रेरणादायी आश्वासन त्यांनी दिले.

डिस्ट्रिक्ट ३२३४चे पदाधिकारी लायन श्रीराम भालेराव, लायन सोनिया गोळे यांनी मेळाव्यास भेट दिली व आयोजकांचे मनोबल वाढविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *