Dighi News : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या सायकलपटूंचा गौरव
Pckhabar-अमर मित्र मंडळ आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सवा निमित्त निसर्ग संवर्धन व स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून विविध शहरी भागात व धार्मिक स्थळी झाडे लावा , झाडे जगवा , पाणी आडवा , पाणी जिरवा , सायकल चालवा , इंधन वाचवा आदी पर्यावरण संवर्धन जनजागृती मोलाच्या कार्या बद्दल पर्यावरण संवर्धन सायकल पटू गौरव सन्मान ” प्रदान करण्यात आला.
यावेळी सायकल पटू दत्ता घुले , मयूर पिंगळे , अतुल चव्हान , झुनेद मुलाणी , कुलदिप कोकाटे ,प्रतिक जाले ,नचिकेत बाकारे ,सौरव खोत ,ओमकार इंगळे, निखिल बांबळे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख उपमहापौर हिरानानी घुले, माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड , अमर मित्र मंडळ अध्यक्ष उदय गायकवाड , नवजीवन शिक्षण मंडळाचे विनायक वाळके , शिवाई नागरी पथसंस्था चेअरमन संजय गायकवाड , माजी सैनिक अध्यक्ष अशोक काशिद ,जयराम वाळके , शांताराम वाळके ,रमेश विरनक , प्रमोद पठारे , विकि आकुलवार , प्रल्हाद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित माडीक यांनी केले.










Leave a Reply