Dehugaon News : अभंग प्रतिष्ठानतर्फे “घरोघरी अभंग” या संकल्पनेचा शुभारंभ


Dehugaon News : अभंग प्रतिष्ठानतर्फे “घरोघरी अभंग” या संकल्पनेचा शुभारंभ

श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या मार्गदर्शनातून उपक्रम

Pckhabar- शब्दची आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन जनलोका ॥
अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या मार्गदर्शनातून “घरोघरी अभंग” या संकल्पनेचा कृतिशील शुभारंभ एकादशीच्या निमित्ताने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये अतिशय भक्तीमय वातावरणात अभंग फलकांचे पूजन करून संपन्न झाला.

याप्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे , श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थानचे विश्‍वस्त शिवाजी महाराज मोरे, माजी अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, मा. विश्वस्त रामभाऊ महाराज मोरे, विश्वस्त माणिक मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, माजी विश्वस्त अशोक महाराज मोरे, संतसेवक उमेश मोरे, संतसेवक वारकरी महामंडळाचे संपर्कप्रमुख जालिंदर महाराज काळोखे, सकळ संत विचार समितीचे अध्यक्ष संतोष महाराज काळोखे, देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव, पत्रकार राजेंद्र काळोखे, राम कुमार अगरवाल, श्रीकांत पिंजण, दत्तात्रय कंद, माऊली भाऊ गायकवाड , अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेश गाडे, सागर मोरे, सचिन काळोखे, सचिन साळुंके, दिनेश साळुंके, अजिंक्य साकोरे, आदिनाथ काळोखे, प्रशांत काळोखे, सतीश काळोखे, नारायण पचपिंड, प्रा. विक्रम भोईटे, विनायक गोलांडे, संतसेवक सन्मेश पांडे, अभिजीत कंद, विकास कंद आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *