
Talegan Crime News : बैलगाडा शर्यतीचे आयोजन ; दोघांवर गुन्हा
Pckhabar- बैलगाडा शर्यतीला बंदी असताना शर्यतीचे आयोजन करणार्या दोघांवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत चावसर वस्तीजवळ शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.
विश्वास शिवाजी कदम (वय 35) व समीर अशोक शेटे (वय 23, दोघेही रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन बबनराव काचोळे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत चावसर वस्तीजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्यासाठी दोन बैल पिकअपमध्ये घालून आणले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply