
Pimpri News : पोलिस प्रशासन सज्ज; गणेश विसर्जनासाठी 1 हजार 83 पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Pckhabar-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्यावर्षी गणेशोत्सव साधेपनाने साजरा करण्यात आला आहे. उद्या (रविवार) गणेश विसर्जन होणार असून नागरिकांनी गर्दी करू नये, कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये आणि सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलाकडून शहर परिसरात वरिष्ठ अधिकार्यांसह तब्बल 1 हजार 83 पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनिष कल्याणकर यांनी दिली.
शहर परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून तिसर्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गणेश विसर्जन असल्यामुळे खबरदारी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुक न काढता साधेपणाने कृत्रिम हौदात अथवा घराच्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
गणेश विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. कोरोनामुळे विसर्जन मिरवणुका होणार नसल्या तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अथवा नागरिकांनी गर्दी करून कोरोनाला निमंत्रण देऊ नये, कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी शहरातील बंद ठेवण्यात आलेले विसर्जन घाट आणि महत्वाच्या चौकात पोलीसांचा खडा पहारा असणार आहे.
असा असणार पोलीस बंदोबस्त
पोलीस उपायुक्त -2
सहाय्यक पोलीस आयुक्त-5
वरिष्ठ पोलीस निरीक्षक-63
सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फौजदार -79
पोलीस हवालदार आणि नायब पोलीस हवालदार-808
होमगार्ड- 126
एसआरफीएफ-1
स्ट्रायकींग फोर्स-2










Leave a Reply