
Pimpri News : घरकूल योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठीची मुदतवाढ
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे राबवण्यात येत असलेल्या घरकूल योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठीची अंतिम
मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
या मुदतीत स्वहिस्सा रक्कम न भरणा-या लाभार्थ्यांचा लाभ रद्द करण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीने या योजनेसाठी 2012 साली संगणक सोडतीद्वारे प्रतिक्षा यादी जाहीर केली होती. त्यामधील 456 लाभार्थ्यांना प्रथम स्वहीस्सा 50 हजार व 3 लाख 26 हजार रूपये भरण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामधील ज्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरता आली नाही त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत स्वहिस्सा भरण्याची मुदत देण्यात आल्याचेही महापौर उषा
ऊर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
स्वहीस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र असणा-या व संगणकीय सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर तसेच झोपडपट्टी
निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करण्यात आली आहे.










Leave a Reply