Pune News : पुणे पोलिस दलात शिपाई पदासाठी 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा


Pune News : पुणे पोलिस दलात शिपाई पदासाठी 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा
Pckhabar- पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या शिपाई पदासाठी येत्या 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळेल.

पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या 214 जागांसाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानंतर या पदांसाठी 39,323 उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *