Pimpri News : भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ

Pimpri News : भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ

Pckhabar- पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली आहे.

आकुर्डी येथील डी.वाय.पाटील ज्ञानशांती शाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज (शुक्रवार) झाले. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले’ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार आहे पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. मात्र, इलेक्टिव्ह मेरिटवर प्रवेश दिला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या वक्तव्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *