Bhosari Crime News : कामावरून काढल्याचा राग; चालकाने गाड्यांवर स्फोटक द्रव्य टाकून लावली आग

Bhosari Crime News : कामावरून काढल्याचा राग; चालकाने गाड्यांवर स्फोटक द्रव्य टाकून लावली आग
Pckhabar- चालक म्हणून काम करणार्‍या एकाला कामावरून काढल्याचा राग अनावरण झाल्याने दोन भावांनी 22 लाखांच्या गाड्यांवर स्फोटक द्रव्य टाकून आग लावली. ही घटना भोसरी, इंद्रायणीनगर येथील  तिलक रेसिडेन्सी येथे 13 सप्टेंबर रोजी पहाटे घडली.
विनोद किसनराव भस्के, अंकित किसनराव भस्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद भस्के हा फिर्यादी यांच्याकडे चालक म्हणून कामाला होता. फिर्यादी यांनी त्याला कामावरून काढल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याने आपल्या भावाशी संगणमत करून फिर्यादी यांच 22 लाख रूपये किंमतीच्या गाड्यांवर स्फोटक द्रव्य टाकून आग लावून नुकसान केले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.