Dehu News : आज माळवाडीत 18 वर्षांपुढील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हिशील्ड लस


Dehu News : आज माळवाडीत 18 वर्षांपुढील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हिशील्ड लस
Pckhabar- पुणे जिल्हा परिषद पुणे व प्राथमिक आरोग्य केंद्र देहू यांच्या मार्फत उपकेंद्र माळवाडी येथील मराठी शाळेमध्ये आज (शुक्रवार) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये 18+ च्या पुढील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हिशील्ड  या लसीचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. अठरा वर्षावरील बंधू भगिनींनी  पाहिलं व दुसरा डोस घ्यावा असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या  शैला खंडागळे यांनी केले आहे.

नागरिकांनी शक्य असल्यास कोविन अॅप वर नोंद केली असेल तर त्याची पोहोच मोबाईल वर असेल तर आणावी. जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल. याकडे लक्ष देऊन आपले संरक्षण आपली जबाबदारी आहे. त्यामुळे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन खंडागळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *