Pune District News : जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतुन 10 लाख रूपये किमतीची श्वानदंश लस खरेदी


Pune District News : जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतुन 10 लाख रूपये किमतीची श्वानदंश लस खरेदी
Pckhabar-पुणे जिल्हयातील सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्तीत-जास्त श्वानदेश रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असून त्याप्रमाणे श्वानदंश प्रतिबंधात्मक लसींची कमतरता ग्रामीण भागात भासत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतुन 10 लाख रूपये किमतीची श्वानदंश वरील ARV लस खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच हापकिन संस्थेकडुन देखील 17, 500 श्वानदंश लस लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे.

पुणे जिल्हयातील सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्तीत-जास्त श्वानदेश रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असून त्याप्रमाणे श्वानदंश प्रतिबंधात्मक लसींची कमतरता ग्रामीण भागात भासत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांमध्ये स्वानदंश सातत्याने होत असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर निदर्शनास आलेले आहे. या करिता दरवर्षीच्या तुलनेत लागणा-या श्वानदंश लसीचे प्रमाण हे वाढल्याचे जाणविले आहे.

जिल्हा परिषद पुणे स्थायी समिती व आरोग्य समिती मधील केलेल्या सुचनेनुसार, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष  रणजित शिवतरे, आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे,  समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, वीरधवल जगदाळे,  तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात,  जिल्हा परिषद गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद स्वनिधीतुन रुपये 10 लाख रुपये किमतीची श्वानदंश लस खरेदी करण्यात आलेली आहे.

तसेच हापकिन या संस्थेकडुन देखील 17, 500  श्वानदंश लस लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे श्वानदंश झालेल्या नागरिकांना शासकिय आरोग्य संस्थांमध्ये श्वानदंश लस मोफत उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, हाफकिन इन्स्टिट्यूट मधून 17500 एआरव्ही डोस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या प्रयत्नाने उपलब्ध होणार असल्याबाबत जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या मार्फत त्यांचा सत्कार  करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *