Sports News : टी ट्वेन्टी वर्ल्ड कपनंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार


Sports News : टी ट्वेन्टी वर्ल्ड कपनंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार
Pckhabar-: टी ट्वेन्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) नंतर विराट कोहली टी ट्वेन्टीचे कर्णधार पद सोडणार आहे. याबाबत कोहलीने सोशल मीडियावरव्दारे माहिती दिली आहे.

विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत.

विराट कोहलीने भारताकडून 65 कसोटी, 95 वन डे आणि 45 टी 20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी 38 कसोटींमध्ये विजय मिळवला, 65 वन डे जिंकले, तर 29 टी 20 सामने आपल्या नावे केले.

रोहित शर्माकडे टी 20 चे कर्णधारपद?

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अशी रोहित शर्माची ओळख आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी करुन, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 विजेतेपदं मिळवून दिली आहेत. त्यामुळे
टी 20 चे कर्णधारपद रोहित शर्माकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *