Maval News :  मावळात दोन दिवस महालसीकरण मोहीम


Maval News :  मावळात दोन दिवस महालसीकरण मोहीम

जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आवाहन

Pckhabar-पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मावळ तालुक्यासाठी कोविशिल्ड लसीचे 10 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. उद्या (शुक्रवार), आणि (शनिवार)  मावळ तालुक्यात तिसरे महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचा
जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.

या अगोदर मावळ तालुक्यात झालेल्या दोन मोहिमेत 33 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मावळ तालुक्यात 2 लाख 70 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर तिसऱ्या लसीकरण मोहिमेसाठी आणखी 10 हजार डोस उपलब्ध झाले आहेत.

या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्र असे एकूण 40 ठिकाणी 18 वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी कोविशिल्डच्या पहिल्या व पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या दुसरा डोससाठी लसीकरण होणार आहे. कोविडचे सर्व नियम पाळून गर्दी न करता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *