Dehugaon Big News : ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’


Dehugaon Big News : ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ
Pckhabar- मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असे म्हणत राज्याच्या राजकारणात काही तरी मोठी घडामोड होण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

देहूगाव येथील एका दुकानाच्या उद्घाटनासाठी आज (गुरूवार) पाटील आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुक्याध्यक्ष रविंद्र भेगडे, देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, सुहास गोलांडे, बाळासाहेब काळोखे, उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, संतोष हगवणे, तात्या पाचपिंड संतोष चव्हाण, सागर म्हूसुडगे, कैलास पानसरे, रायबा मोरे, सोनाली घोडेकर व आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमात मंचावर सूत्रसंचालक वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होता. तेव्हा पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे सूचक विधान केले. पाटील यांच्या विधानामुळे मात्र राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर  यांनी भाजपशी युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे.  खेडेकर यांनी थेट भाजपशी युती करण्याचे लेखात उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खेडेकर यांच्या या लेखावर प्रदेशाध्यक्ष  पाटील म्हणाले, पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *