
Dehuroad Crime News :
उधारीवर वडापाव न दिल्यामुळे बाप-लेकाला मारहाण
Pckhabar- हातगाडीवर वडापाव व्रिकी करणार्या बाप-लेकाने उधारीवर वडापाव न दिल्यामुळे तिघांनी लोखंडी गजाने, जगाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास किवळे ब्रिजजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली आहे.
काळुराम रघुनाथ जाधव (वय-44) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महेश काळुराम जाधव (वय-19) आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आदित्य दत्तात्रय तरस (वय-19, रा. किवळे) याने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य याची किवळे पुलाजवळ वडापावची हातगाडी आहे. आरोपी काळुराम जाधव हा उधारीवर वडापाव मागत होता. आदित्यने वडापाव देण्यास विरोध केल्यानंतर त्याने दोन्ही मुलांना बोलवून घेतले. अल्पवयीन आरोपीने फिर्यादीला स्टिलच्या जगाने मारहाण केली. तर काळूरामने डाव्या पायाच्या मांडीला चावा घेऊन जखमी केले. महेशने फिर्यादीच्या वडिलांचे दोन्ही हात पाठीमागून धरून ठेवल्यानंतर अल्पवयीन आरोपीने लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply