
Pimpri Big Khabar: भाजपला मोठा धक्का; भाजप संलग्न अपक्षाचे गटनेते बाबा बारणे राष्ट्रवादीत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संलग्न असणाऱ्या अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास ऊर्फ बाबा बारणे यांनी आज (गुरूवार) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, उद्योजक अभय मांढरे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ऋषिकेश काशिद, योगेश साळुंखे, प्रविण बारणे, अक्षय बारणे, तुषार मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत बारणे हे थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमी बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, आगामी काळात भाजपचे शहरातील तब्बल 15 ते 20 नगरसेवक
हातावर घड्याळ बांधणार असल्याचे समजते.










Leave a Reply