Pimpri  News : शहराच्या विकासात अभियंत्यांचे योगदान महत्वपूर्ण : महापौर माई ढोरे

Pimpri  News : शहराच्या विकासात अभियंत्यांचे योगदान महत्वपूर्ण : महापौर माई ढोरे

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अभियंत्यांचे योगदान महत्वपूर्ण असून शहराच्या अत्याधुनिक मोठ-मोठ्या प्रकल्पांमधून त्यांच्या कार्याची चुणूक दिसून येते असे गौरवोद्गार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी काढले.

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांची जयंती राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरी करण्यात येते त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील  त्यांच्या  पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते आज पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य योगेश बहल, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, शिरीष पोरेडी, सुनिल वाघुंडे, बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, उपअभियंता अनघा पाठक, उप अभियंता विजय भोजने, सुरेखा कुलकर्णी, पिंपरी चिंचवड इंजिनिअर्स असोसिएशनचे संदीप खोत, सुनिल बेळगावकर, संतोष कुदळे इतर पदाधिकारी आणि अभियंते तसेच कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे तसेच महासंघ प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिकेच्या आठही प्रभागात तसेच झोनिपू स्थापत्य विभागात पदाधिकारी आणि अभियंता  यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *