Ganesh Festival USA News : निंबुतचे काकडे कुटुंब अमेरिकेत साजरा करताहेत गणेशोत्सव!

Pckhabar-गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणेशोत्सव म्हटलं की आपल्याकडे एक वेगळाच उत्साह असतो. सगळीकडे चैतन्य पसरलेले असते. कामानिमित्त परदेशात असल्यामुळे या सर्वांपासून आपण वंचित राहू नये तसेच आपल्या मुलांना आपले सण, समारंभ यांची माहिती असावी, आणि आपली संस्कृती, परंपरा जपावी, सतत याचा ध्यास घेतलेले निंबुतचे काकडे कुटुंब गेली तीन वर्ष अमेरिकेतील सिएटल या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत आहेत. या दहा दिवसांच्या मंतरलेल्या काळामध्ये त्यांच्याकडे त्यांचा मित्रपरिवार, स्नेही , अमेरिकेतील काही कुटुंब आरतीसाठी, गणेशाच्या दर्शनासाठी येत असतो.
दरवर्षी पर्यावरण पूरक गणपती बाप्पाची मूर्ती, सुंदर सुबक फुलांची आरास, मोदकांचा नैवेद्य, आरती अशी साग्रसंगीत गणपतीची आराधना केली जाते.
राहुल रत्नसिंह काकडे त्यांच्या पत्नी दिपाली राहुल काकडे आणि त्यांच्या दोन कन्या रितिका व रिजूल असे सर्व कुटुंब मिळून गणपतीची मनोभावे आराधना करतात.










Leave a Reply