
Talegan Dabhade News : तळेगाव- चाकण रस्ता रूंदीकरणाचे काम अर्धवट; ठेकेदारावर गुन्हा दाखल
Pckhabar- तळेगाव-चाकण रस्ता रूंदीकरणाचे काम ठेकेदाराने अर्धवट केल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या अपघाताला जबाबदार ठेकेदारच असल्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मोहनलाल मथरानी क्रन्सट्क्शन
या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप महादू डोळस (वय-57, रा. माळवाडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
तळेगाव-चाकण रस्ता रूंदीकरणाचे काम
मोहनलाल मथरानी क्रन्सट्क्शन या ठेकेदाराला मिळाले आहे. 4 मे 2021 ते 13 सप्टेंबर अखेर रस्ता रूंदीकरणाचे अर्धवट काम ठेवल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. खोदकाम केल्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. या अपघाताला संबंधित ठेकेदारच जबाबदार आहे. त्यामुळे
मोहनलाल मथरानी क्रन्सट्क्शनच्या ठेकेदारावर कलम 431 आणि कलम 336 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply