Sangvi Crime News : शादी डॉट कॉमवरून झालेली ओळख महिलेला पडली महाग


Sangvi Crime News : शादी डॉट कॉमवरून झालेली ओळख महिलेला पडली महाग

गिफ्टच्या नादात महिलेला 14 लाखांला गंडविले

Pckhabar- शादी डॉट कॉमवरून ओळख झालेल्या एकाने महिलेला वाढदिवसाचे गिफ्ट पाठवले असून ते दिल्ली कस्टम विभागातून सोडविण्यासाठी विविध कारणे सांगून 14 लाख बँक खात्यावर भरण्यास सांगून फसवणूक केली. हा प्रकार नुकताच सांगवी येथे उघडकीस आला.

संजय कुलभुषण जाधव (रा. रामबाग कांदिवली, पवई, मुंबई) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे शादी डॉट कॉमवर अकाऊंट आहे. यावरून आरोपीबरोबर त्यांची ओळख झाली. आरोपीने फिर्यादी यांना फोटो व बायोडेटा पाठवून लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 29 एप्रिल रोजी महिलेचा वाढदिवस असल्याने आरोपीने महिलेला एक गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. ते गिफ्ट दिल्ली कस्टममधून सोडविण्यासाठी सुरूवातीला 38 हजार रूपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर विविध कारणे सांगून 14 लाख 9 हजार 208 रूपये खात्यावर भरण्यास सांगून गिफ्ट न पाठवता फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *