
Ganesh Festival News : कोविड योद्धांचा गौरी-गणपती सजावटीतून गौरव
माजी उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे
यांच्या घरच्या देखाव्याचे सर्वत्र कौतुक
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीत जिवावर उदार होऊन कार्य करणाऱ्या कोविड योद्धांचा गौरी- गणपती सजावटीतून माजी उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांनी गौरव केला आहे. काळोखे यांच्या देखाव्याचे देहूगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
दरम्यान, आज (सोमवार) देहूरोड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे आणि इंद्रायणी नेत्र रूग्णालयाच्या डॉ. विद्या यादव यांना आरतीचा मान देण्यात आला होता.
काळोखे यांनी गौरी गणपती निमित्ताने अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा संदेश समाजाला आपल्या घरातील देखाव्यातून दिला आहे. कोरोना संकट काळामध्ये महिलांनी जे योगदान दिले आहे.
त्या अनुषंगाने गौरीला पोलीस आणि डॉक्टरांचा वेश परिधान करून सेवेचा संदेश दिला आहे. नियम पाळा कोरोना टाळा..असे अनेक अर्थपूर्ण आणि प्रबोधनात्मक संदेश फलक लावण्यात आले आहेत.
देव देवळात नाही तर चालत्या बोलत्या सेवा करणाऱ्या माणसांच्या हृदयात आहे. हाच संदेश या गौरी पूजनाच्या निमित्ताने देण्यात आला आहे..
गाय आणि वासरू अर्थात गोवंश वाचवा, बैलगाडा आणि शेतकरी अशाही देखव्यांचा यात समावेश आहे. असा अनोखा पण अत्यंत महत्वपूर्ण देखाव्याचे आयोजन केले आहे.
गेल्या अनेक काही वर्षांपासून बंद असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी, यासाठी कै. सहादु मामा काळोखे पाटील बैलगाडा संघटना & देहूगाव बैलगाडा संघटनेच्या वतीने गौरी- गणपतीला साकडे घालण्यात आले.
याबाबत माजी उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांचे विशेष कौतुक सर्व स्तरावर होत आहे करण्यात येत आहे










Leave a Reply