भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील ‘हा’ विशेष फरक
pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांकरिता निधी कमी पडू देणार नाही. ‘तुमच्या ओळखीचा अर्थमंत्री आहे, कोरोनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी निधी देण्याबाबची विनंती केली होती. कार्यकर्त्यांच्या गराड्यात दादांनी लांब थांबलेल्या भापकर यांना बोलावून घेऊन निधी देण्याची ग्वाही दिली. भाजप सरकार असताना आम्हाला नजरकैतेद ठेवले जात होते. जनहिताचे प्रश्न मांडून दिले जात नव्हते. आता लांब असून देखील आम्हाला बोलावून घेऊन निवेदनाची दखल घेतली जाते. हाच तर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील विशेष फरक दिसून येत असल्याचे” मारुती भापकर म्हणाले.
दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकत्रितपणे नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.7) शहरात आले होते.










Leave a Reply