Ganesh Festival News : बाप्पांच्या सजावटीत हिंदू सणांची संकल्पना; आकर्षक सजावटीत शेलार कुटुंबांचे गणराया विराजमान

Ganesh Festival News : बाप्पांच्या सजावटीत हिंदू सणांची संकल्पना; आकर्षक सजावटीत शेलार कुटुंबांचे गणराया विराजमान

Pckhabar- भोसरी, आळंदी रोड, जय महाराष्ट्र चौकजवळ वास्तव्यास असलेल्या शेलार कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी शेलार कुटुंबाचे बाप्पा हिंदू सणाच्या आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईमध्ये विराजमान झाले आहेत.

ही सजावट गायत्री आशिष शेलार, अंजली अमित शेलार यांनी केली आहे.

याबाबत माहिती देताना गायत्री आणि अंजली शेलार म्हणाल्या ” भारतीय संस्कृतीत हिंदू धर्मातील सर्वच सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही दरवर्षी गणपती सजावट करत असतो. मात्र, यावर आकर्षक सजावट करण्याचा मानस होता. त्यामुळे आम्ही यावर्षी हिंदू धर्मातील रामनवमी, दत्त जयंती, नागपंचमी, रक्षाबंधन, होळी, गुढीपाडवा, वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, गुरू पौर्णिमा, स्वांतत्र्य दिन, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, हरितालिका, बैल पोळा, विजया दशमी आणि दिवाळी या सणांचा देखावा साकारला आहे. सर्व सणांच्या मूर्ती ठेवून सणांचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शेलार यांच्या गणरायाचा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घराजवळील अनेक नागरिक पाहण्यास येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *