
Dehu News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चार ठिकाणी गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था
Pckhabar- गणेशोत्सवावर कोरोनाच्या जागतिक महामारीचे सलग दुसर्या वर्षी संकट आहे. गणेशभक्तांना गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देहू परिसरात चार ठिकाणी गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जन ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी सर्व विसर्जन घाट व हौदावर यावर्षी गतवर्षी प्रमाणे कोरोनामुळे निर्बंध आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उत्साही व आनंदी वातावरणात साजरा व्हावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देहूगावात, विठ्ठल नगर, माळी नगर, गाथा मंदीर परिसर या चार ठिकाणी गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी ट्रँक्टर असणार आहेत.










Leave a Reply