Pimpri News : उज्वल यशासाठी मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा: एम जे एफ लायन अशोक येवले

Pimpri News : उज्वल यशासाठी मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा: एम जे एफ लायन अशोक येवले
Pckhabar- “मोजमाप पद्धती -उपकरणे व परिमाणे ” या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ” उज्वल यशासाठी विषयाच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा “असा मोलाचा सल्ला एम जे एफ लायन अशोक येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना दिला.

प्रेरणा कौशल्य विकास संस्था,लायन्स क्लब ऑफ पूना निगडी,लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड व इंद्रायणी व्होकेशनल कॉलेज भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत लायन अशोक येवले मार्गदर्शन करीत होते. या कार्यशाळेत 40 विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यात 10 वी, 12 वी,आय.टी. आय, डिप्लोमा व पदवीधारकांचा समावेश होता.

जनगणना ,चलनची मोजणी,अंतर,वजन व घनफळ यांचे मापन,जमीन मापण्याची पद्धत व प्रचलित परिमाणे,वाहनांचा वेग,समुद्र मैल व विमानांचा वेग या विषयी लायन अशोक येवले यांनी सविस्तर विवेचन केले.

प्रवीण पाटील यांच्या सहकार्याने फूटपट्टी,मीटर टेप,व्हर्नियर,मायक्रोमीटर या उपकरणांचा उपयोग प्रात्यक्षिकांसह लायन येवले यांनी समजावून सांगितला.

एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मोजमाप पद्धती, उपकरणे व परिमाणे यांचा चार्ट देण्यात आला व त्याचा उपयोग घरी, शाळा व कॉलेजेसमध्ये शिकविण्यासाठी करावा असे आवाहन लायन येवले यांनी केले.
इंद्रायणी व्होकेशनल कॉलेजचे संचालक देवरे यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हातभार लावलाच परंतू त्यांचा पूर्णवेळ सहभाग सर्वांसाठी प्रेरणादायी होता.

या प्रसंगी लायन येवले यांनी रु 5000 देवरे यांच्याकडे गरजूंच्या शैक्षणिक मदतीसाठी सुपूर्त केले.

लायन रामकृष्ण मंत्री, देविदास ढमे, राजश्री साठे, दिगंबर ढोकले यांनी कार्यशाळेस भेट देऊन आयोजकांचे मनोबल वाढविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *