
Ganesh Festival News : मनोभावे गणरायाकडे करूया प्रार्थना; कोरोना घालविण्याचे दळवी कुटुंबाचे बाप्पाला साकडे
Pckhabar- महाराष्ट्र राज्य लोकसेवा महासंघाचा मानाचा ,प्रथम नामांकन , कविभुषण पुरस्कार, कविवर्य,, राष्ट्रीय फिनिक्स साहित्य रत्न पुरस्कार ,,आदर्श कविभुषण असे १७ पुरस्कार प्राप्त, पंचक्रोशी विधालय दारुंबरे
व कोथूरणे , सोमाटणे गावचे सुपुत्र विठठल रामु दळवी यांनी महाराष्ट्राची ,असिमता व परंपरा जपत , गेली सात वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने विधिवत गणरायाची स्थापना करत, सारं जग संकटात असताना, रात्रंदिवस विचारांतुन समाजाची सेवा करून आपले विचार समाजापुढे मांडत आपल्या सुंदर लेखणीतून समाजाला विचारांतुन जागे करण्याचे प्रभावी साधन हाती घेऊन, याच महायानक कोरोणाचा सामना कसा करावा, सृष्टीटी ऱ्हास कसा थांबवावा, ग्रंथाचे रक्षण का व कसे करावे,, समाजाचे हित कसे जाणावे, विचारांतुन देशसेवा कशी करावी , याच महामारीतुन मार्ग कसा काढावा, अशा प्रकारे गणरायाकडे मनापासून साकडे घालत , मनोभावे प्रार्थना करत, विचारांचे अभंग रचत , देशसेवेचा मार्ग धरत , हे देवा कोरोणारुपी संकट कमी होऊ दे, पुन्हा सुंदर दिवस येऊदे, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण होऊदे,देवा पून्हा रामराज्य ,शिवराज्य येऊदे.
देशातील ग्रंथाचे ,नैसर्गिक साधनसंपत्तीचे ,वन्यजीवांचे पशुपक्ष्यांचे , गो, मातेचे पुन्हा संगोपन व रक्षण होऊदे,, आरोग्यातुन, संत विचारांतुन सारा देश सुजलाम सुफलाम होऊदे याचसाठी आतातरी गणरायाकडे करूया प्रार्थना सुंदर ठेवूया भावना, बापा कमी होऊदे हा महाभयंकर कोरोना, वंदे मातरम, भारत माता कि जय.














Leave a Reply