Bhoom political News : धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Bhoom political News : धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Pckhabar-  धनगर समाजात वर्चस्व असलेले जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आज (रविवार) जाहीर केला आहे.

सुरेश कांबळे यांचा 16 सप्टेंबर रोजी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील, माजी आमदार राहूल मोटे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.

कांबळे यांचे जय हनुमान ग्रुपच्या माध्यमातून भूम-परांडा- वाशी विधानसभा मतदारसंघासह पुण्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी विधानसभेची निवडून देखील लढवली होती.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *