Talegan Dabhade News: नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना शिस्तभंगाची नोटीस


Talegan Dabhade News: नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना शिस्तभंगाची नोटीस

Pckhabar-तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे या भाजपाच्याच नगरसेवकांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी नोटीस शहराध्यक्ष रवींद्र माने यांनी बजावल्याचे शनिवारी सांगितले.  त्यामुळे एकच खळबळ उडाली असून भाजपचा अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आला आहे.

तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाने
शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शहराध्यक्ष रवींद्र माने, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, सभागृहनेते अरुण भेगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले ”तळेगाव नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आमदार सुनील शेळके खोटे आरोप करून भाजपला बदनाम करत आहेत. शहरात विकासाचे आदर्श व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन विविध योजना तळेगावासाठी राबविल्या आहेत. विरोधकांनी भाजपवर बेछूट व बिनबुडाचे आरोप करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा भेगडे यांनी दिला.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *