Dehu News : राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट सोलन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या मृन्मयीचा सत्कार

Dehu News : राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट सोलन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या मृन्मयीचा सत्कार

Pckhabar- राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट सोलन हिमाचल प्रदेश या ठिकाणी संपन्न झालेल्या स्पर्धेत देहूतील स्टार फाईटर्स क्लबच्या कु.मृन्मयी संजय काळोखे हिने सुवर्णपदक पटकावले आहे. याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

क्रिडा मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट सोलन हिमाचल प्रदेश येथे नुकतीच ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत मृन्मयीने यश संपादन केले.

मृन्मयीचा संत तुकाराम महाराज पादुका स्थान मंदिर, सिद्धीविनायक मित्र मंडळ, GDMA क्लास देहू आणि रा.स्व.संघ जगदगुरु साप्ताहिक मिलन यांच्या वतीने पेढे भरवून फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील यशशिखरे पादांक्रांत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *