Sangvi Crime News: धक्कादायक! कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देऊन शिक्षिकेवर बलात्कार

Sangvi Crime News: धक्कादायक! कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देऊन शिक्षिकेवर बलात्कार
Pckhabar- पैशांची अडचण असल्यामुळे ओळखीच्या व्यक्तीकडे पैशांची मागणी केल्यानंतर रिटायर एसपी म्हणून सांगणार्‍या एकाने घरी बोलावून घेत कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव येथे डिसेंबर 2019 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला.

विकास अवस्ती (रा. डायनासमोर गार्डन जवळ, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिक्षिकेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिक्षिका असून त्यांना पैशांची गरज होती. आरोपी हा फिर्यादी यांच्या ओळखीचा असून त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीने 10 टक्क्के व्याजाने पैसे देतो, असे म्हणून घरी बोलावून घेतले. त्यांच्याकडून दोन कोर्‍या धनादेशावर व कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या. फिर्यादी यांना कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने बलात्कार केला.

तसेच अश्लील फोटो काढला. हे फोटो शाळेत आणि घरी दाखविण्याची धमकी देत शिक्षिकेला आणि घरच्यांनाही मारण्याची धमकी दिली. तसेच मी रिटायर एसीपी असे असे म्हणून माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नसल्याचे म्हणाला.
महिला पोलीस उपनिरीक्षक रूपनर अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *