
Dehu News : आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांच्यातर्फे गणेश मुर्ती संकलन अभियान
Pckhabar- देहूगाव ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांच्या वतीने गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश मुर्ती संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सवावर कोरोनाच्या जागतिक महामारीचे सलग दुसर्या वर्षी संकट आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने गणेशोत्सवावर अनेक निर्बंर्ध आणले आहेत. गणेशभक्तांना गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी जाऊन देहूगाव परिसरात श्री गणेशमुर्ती संकलन अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जन ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी सर्व विसर्जन घाट व हौदावर यावर्षी गतवर्षी प्रमाणे कोरोनामुळे निर्बंध आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उत्साही व आनंदी वातावरणात साजरा व्हावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
स्वप्निल काळोखे यांनी श्री मूर्ती संकलनासाठी सजवलेले दोन रथ तयार केले आहेत. या रथाच्या माध्यमातून देहूगाव, विठ्ठलवाडी परिसरात श्री गणेश मूर्ती संकलन करण्यात येणार असून प्रत्येक रथात मुर्ती संकलनासाठी 2-2 मुले असणार आहेत.
इंद्रायणी माईचे पावित्र्य राखण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून श्री गणेश मुर्ती संकलन अभियान राबविण्यात येत आहे. गतवर्षी श्री गणेश मुर्ती संकलन अभियानाला देहू परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता, यावर्षीही गणेश भक्तांनी मुर्ती संकलनासाठी जास्तीत-जास्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन स्वप्निल आप्पा कोळोखे यांनी केले आहे.
# आपण आपल्या घरातच श्रीगणेशमुर्तीचे पुजन करून विर्सजन विधी करून आपली श्रीगणेश मुर्ती संकलन रथावर देणे.
#श्रीगणेश मुर्ती संकलन करण्यासाठी एकाच व्यक्तीने यावे.
# येताना मास्क लावणे बंधनकारक आहे.











Leave a Reply