Chinchwad News: घरोघरी जाऊन गणेशमुर्ती दान स्विकारले जाणार


Chinchwad News: घरोघरी जाऊन गणेशमुर्ती दान स्विकारले जाणार
Pckhabar-संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभागाच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी घरोघरी जाऊन गणेशमुर्ती दान स्विकारली जाणार आहे.

प्रत्येक प्रभागात ४ टाटा एस गाड्यांची सोय केली आहे. ज्या सोसायटीमध्ये ५० पेक्षा जास्त गणेशमुर्ती असतील अशा ठिकाणी स्वयंसेवक स्वतः जाऊन त्या मुर्ती दान घेतील संस्थेचे पदाधिकारी व सभासद प्रत्येक गाडीसोबत ४ जण असतील या शिवाय चिंचवड मधील हॉटेल रिव्हर व्ह्यु शेजारी ५ दोन पदाधिकारी व त्यासोबत ८ सभासद मदतीला असणार आहेत दान घेतलेल्या गणेशमुर्तींचे विधीवत विसर्जन करण्यासाठी ८ जण दरारोज सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत विनोदे वस्तीवरील तळ्यावर सेवा देण्यासाठी हजर असणार आहेत.

सर्व संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड आणि पदाधिकारी कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे सचिव भरत शिंदे,उपाध्यक्ष शब्बीर मुजावर उपाध्यक्षा नम्रता बांदल,खजिनदार मनोहर कड,संचालिका सुनंदा निक्रड,संचालिका प्रिया पुजारी,कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर प्रमुख प्रदिप बोरसे,आनंद पुजारी,राजु निक्रड उपस्थित होते गणेश उत्सवाच्या पुर्व संध्येला पुर्ण नियोजन बैठक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *