
Pimpri Crime News : शाई फेक प्रकरण; भाजप नगरसेविकेसह अकरा जणांना अटक, 1 दिवसांची पोलीस कोठडी
Pckhabar-महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकत एका अधिकार्याच्या खुर्चीवर फुले आणि शाई टाकणार्या भाजपच्या महिला नगरसेविकेसह 11 जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात घडला. दरम्यान, शुक्रवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नगरसेविका आशा तानाजी धायगुडे-शेडगे, पूजा अरविंद भंडारी (वय-25), शीतल पंकज पिसाळ (वय-21), गौरी कमलाकर राजपाल (वय-31), आशा जैसवाल (वय-40), शीतल महेश जाधव (वय-36), जयश्री रामलिंग सनके (वय-33), संध्या रमेश गवळी (वय-47), स्वप्नील भारत आहेर (वय-21), संजय शंकर पवार (वय-19), संजय शेडगे (वय-45, सर्व रा. कासारवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रमोद रामकृष्ण निकम (वय 52, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेेचे अधिकारी अशोक मारूती भालकर यांच्या अंगावर शाई टाकण्याच्या उद्देशाने नगरसेविका शेडगे आणि त्यांच्या अन्य समर्थकांनी आपसात कट रचला. भालकर यांच्या दालनात जाऊन त्यांच्या खुर्चीवर फुले आणि काळी शाई टाकली. टेबलवर ‘धिक्कार’ असे लिहिले. महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून आयुक्तांना व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी दालनातून बाहेर पडण्यास अटकाव केला. सुरक्षा रक्षक, पोलिसांना धक्काबुक्की करून आयुक्तांच्या दालनाच्या भिंतीवर लावलेल्या नावाच्या नामफलकावर काळी शाई फेकली.
महापालिकेमध्ये मोठमोठ्याने ओरडून महापालिकेच्या दैनंदिन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पलांडे तपास करीत आहेत.










Leave a Reply