Ganesh Festival News : अरविंद एज्युकेशन सोसायटीत विधिवत पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना

Ganesh Festival News : अरविंद एज्युकेशन सोसायटीत विधिवत पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना
Pckhabar-जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल व भारतीय विद्या निकेतन विद्यालयात गणपती विधिवत पूजा करून प्रतिष्ठाना करण्यात आली.

संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव राव यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली. ‘कोरोना लवकर संपू दे आणि शाळा पूर्ववत सुरू होऊ दे’ असे साकडे त्यांनी गणपतीला घातले.

यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *