Talegaon Dabhade News: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी सतीश दिघे

Talegaon Dabhade News: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी सतीश दिघे

Pckhabar-तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील
प्रशासन अधिकारी सतीश दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्याम पोशेट्टी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर परिषदेच्या एका प्रकरणात अटक केल्यानंतर पोशेट्टी यांचे निलंबन करण्यात आले. जून महिन्यापासून हे पद रिक्त होते. लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहत होते.

कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, अशी सर्व पक्षीय नगरसेवकांची मागणी होती. तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर येथील नगर परिषदेस मुख्याधिकारी मिळाला आहे. दिघे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सतिश दिघे हे सोमवारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सतीश दिघे यांनी शिर्डी येथील
नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. स्वच्छ शहरात  शिर्डीचा देशात तिसरा क्रमांक त्यांच्या कार्यकाळात मिळाला होता. तसेच विविध प्रश्नांनी त्रस्त असलेल्या तळेगावकरकरांना समस्या मुक्त शहर करण्याची जबाबदारी दिघे यांच्यावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *